अभिरुप युवा संसदेमधून विद्यार्थ्यांचा नेतृत्व विकास -डॉ. व्हि.जि. ठाकरे

बुलढाणा जिल्ह्याने पटकाविला प्रथम क्रमांक

अमरावती/प्रतिनिधी – युवक बिरादरी व शिवाजी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयांमध्ये अभिरूप युवा संसद स्पर्धेचे आयोजन दिनांक 31 जानेवारीला करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यातील 15 महाविद्यालयाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य, संसदीय व्यवस्थेची माहिती, संवाद व प्रतिपादन कौशल्य, शाश्वत विकास व पर्यावरण विषयक जागृती, स्थानिक प्रश्नांची जाणीव व ते सोडविण्यासाठी पुढाकार, राष्ट्रीय एकात्मता व संवैधानिक मूल्य रुजवण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे गेल्या पाच वर्षापासून सदर उपक्रम राबविला जातो. अभिरूप युवा संसद स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. व्ही. ठाकरे यांनी केले. लोकशाही व्यवस्थेमध्ये नेतृत्व विकास ही महत्त्वाची प्रक्रिया असून अभिरूप संसदेमधून विद्यार्थ्यांचा नेतृत्व विकास होण्याची संधी मिळते असे मत त्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाच्या स्टुडन्ट कौन्सिल मधून विद्यार्थ्यांचे नेतृत्व घडत होते असेही त्यांनी सांगितले. युवक बिरादरी प्रकल्पाचे संयोजक पंडित पंडागळे यांनी शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे आयोजित केलेल्या युवा नेतृत्व विकास शिबिर युवा भूषण स्पर्धा तसेच अभिरूप संसदे मध्ये व्यापक प्रमाणात विद्यार्थी सहभागा विषयी माहिती दिली. उद्घाटकीय सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भिसे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने ही संधी महाविद्यालयाला दिल्याबद्दल आभार मानले. डॉ. किशोर साबळे, डॉ. मनोज जगताप डॉ. उमेश कडू ,रोशनी उगले यांनी अतिथींचे स्वागत केले. अभिरुप युवा संसद स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी प्राचार्य विवेक सोनटक्के, ऋषभ राऊत व सचिन वाकुडकर नागपूर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. महेंद्र मेटे यांनी केले.*बुलढाणा जिल्ह्यातील महाविद्यालयांनी पटकाविला प्रथम क्रमांक* अभिरूप युवा संसदेच्या स्पर्धेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील महाविद्यालयांनी प्रथम क्रमांक पटकाविला. सदर युवा संसद संघामध्ये जिजामाता महाविद्यालय बुलढाणा, पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा रेल्वे, श्री शिवाजी कला व विज्ञान महाविद्यालय चिखली व शिवाजी महाविद्यालय मोताळा यांचा समावेश होता. द्वितीय क्रमांक अमरावती जिल्ह्यातील श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अमरावती शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, जे डी पाटील सांगळुदकर महाविद्यालय दर्यापूर व शिवाजी शिक्षण महाविद्यालय यांच्या संयुक्त संघाने पटकविला. तृतीय क्रमांक अकोला जिल्ह्यातील शिवाजी कला व विज्ञान महाविद्यालय अकोला, शिवाजी महाविद्यालय अकोट, डॉ. एच एन सिन्हा महाविद्यालय पातुर व डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय तेल्हारा यांच्या संयुक्त संघाने पटकविला. चौथा क्रमांक तिवसा येथील वाय. डी. व्हि.डी महाविद्यालयाने पटकविला.

अभिरूप युवा संसदेमध्ये गाजलेले प्रश्न व विधेयक

अभिरूप युवा संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नापिकी, पिक विमा, शेतमालाला हमीभाव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, मणिपूर येथील हिंसाचार, महागाई, बेरोजगारी व आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर विरोधक व सत्तारूढ पक्षांमध्ये चर्चा घडून आली. अभिरूप युवा संसदेमध्ये पक्षांतर विरोधी कायदा, पर्यावरण संवर्धन शैक्षणिक धोरण, महिला धोरण, इत्यादी विषयांवर शासकीय व खाजगी विधेयके मांडले गेले.

उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार

डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आशुतोष संतोष इंगोले व शिवाजी महाविद्यालय मोताळा सहा विद्यार्थी गौरव राजेंद्र शिंदे यांची उत्कृष्ट संसद पटू म्हणून निवड करण्यात आली.

2 thoughts on “अभिरुप युवा संसदेमधून विद्यार्थ्यांचा नेतृत्व विकास -डॉ. व्हि.जि. ठाकरे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top