डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची अक्सा मिर्झा ठरली प्रथम पुरस्काराची मानकरी

राष्ट्रीय पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा

अमरावती /प्रतिनिधी- छत्रपती संभाजी नगर येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पावर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेत अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.अक्सा मिर्झा हिने प्रथम पुरस्कार प्राप्त केला.बाराव्या राष्ट्रीय पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेत डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या चमूने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करून यश प्राप्त केले आहे. संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे महाविद्यालयाच्या अभिरूप न्यायालय सभागृहात दिनांक 30 जानेवारी रोजी ही स्पर्धा घेण्यात आली. देशभरातून अनेक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विविध विषयावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची वैष्णवी पाचडे हिने पटकाविले. दोन्ही विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख यांनी सत्कार करून त्यांचे कौतुक केले.यावेळी चमुचे मार्गदर्शक डॉ.राजेश पाटील यांच्या सह सर्व उपस्थित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top