स्वरवैदर्भी गायन स्पर्धेत वैदर्भीय स्पर्धकांचा सहभाग

वर्धा –
सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त ‘स्वरवैदर्भी’ हिंदी सिनेगीत गायन स्पर्धेत विदर्भातील ८६ गायकांनी सादरीकरण केले. सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डाॅ अभ्युदय मेघे यांनी केले. यावेळी, स्वरवैदर्भीचे संयोजक संजय इंगळे तिगावकर, सहसंयोजक अभय जारोंडे, सुनील रहाटे, परीक्षक आनंद निधेकर, जगदीश दळवी, विद्या गावंडे (नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेतील गायकांना प्रवीण काळे (संवादिनी), अशोक टोकलवार (तबला), चारू साळवे (की बोर्ड) व सुभाष वानखेडे (ऑक्टोपॅड) यांनी संगीतसाथ केली. या प्राथमिक फेरीतून महाअंतिम स्पर्धेसाठी १२ स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले. संचालन माधुरी मेश्राम व सुमीत उगेमुगे यांनी केले. तर आभार अभय जारोंडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनात सुशांत वानखेडे, सिद्धार्थ चव्हाण, हितेश मुरकुटे, पंकज अडेकर, अभिजित राऊत, रवि ढोबळे, स्वप्निल चरभे, अफसर पठाण, स्वाती लोहारे, कविता हिवरकर, निलेश ठाकरे, संतोष फिरके, हेमंत पुंडकर, संतोष वाळके, रिना भगत, किरण आंबटकर, शरद कांबळे, अमोल बरडे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला विदर्भातील संगीतप्रेमींची उपस्थिती होती.