डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळा

अमरावती/ प्रतिनिधी -डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन नुकतेच डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात यशस्वीरित्या करण्यात आले.6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2024 यादरम्यान घेण्यात आलेल्या चार दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ.राजीव बोरकर होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख होत्या. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. महेंद्र इंगोले यांनी कार्यशाळेबद्दल रूपरेषा सांगितली.समन्वयिका प्रा. डॉ. राधिका देशमुख यांनी प्रथम सत्राचे संचालन केले. या कार्यशाळेमध्ये डॉ. युवराज वैद्य, डॉ.सोनल कामे, डॉ.नितीन मोहोड आणि डॉ.पल्लवी मांडवगणे यांचे विविध विषयांवर बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. समरोपिय सत्रात डॉ. महेंद्र इंगोले, डॉ. राधिका देशमुख,डॉ. प्रणय मालवीय डॉ.पल्लवी मांडवगणे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सांगितले की, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असले तर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा वापर करावा. संस्कारीत मूल्य विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी मदत करतात. कला कौशल्याचा वापर करून यशाचा मार्ग विद्यार्थ्यांनी निवडावा असे विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. राधिका देशमुख व आभार प्रदर्शन डॉ. महेंद्र इंगोले यांनी केले कार्यशाळेला डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top