अंतिम सामन्यात डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय विजयी

श्री शिवाजी शिक्षण संस्था मुख्य कार्यालय ठरला उपविजेता संघ

अमरावती/प्रतिनिधी-

श्री शिवाजी शिक्षण संस्था मुख्य कार्यालय आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्यात झालेल्या क्रिकेट मॅच च्या अंतिम सामन्यांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाने विजय मिळवला असून श्री शिवाजी शिक्षण संस्था मुख्य कार्यालयाचा संघ उपविजेता ठरला आहे.डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती उत्सवानिमित्ताने डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या मैदानात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये ब गटातून श्री शिवाजी शिक्षण संस्था मुख्य कार्यालय आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय यांच्यात क्रिकेटचा अंतिम सामना झाला. या सामन्यात आठ षटकात 115 धावांचा पाठलाग करताना मुख्य कार्यालयाचा संघ 85 धावा करू शकला. सामन्यांमध्ये मुख्य कार्यालयाकडून विवेक हिवसे यांनी तर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातर्फे प्रा. राजेश पाटील यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत आपापल्या संघाला योगदान दिले. श्री शिवाजी शिक्षण संस्था मुख्य कार्यालयाच्या वतीने नितीन कडू, विवेक हीवसे, सचिन आढाऊ ,नितीन काकड,गजानन बाखडे, प्रवीण देशमुख, सौरभ निंभोरकर, अभिजीत बुरघाटे, राजेश गाडगे, तेजस सोनवणे जीवन हरणे,आशिष इखे ,प्रणव देशमुख,सुनील जाधव, भूषण अंबाडकर, यांनी सहभाग घेतला. अधीक्षक जगदीश भांगे यांनी निवड समिती प्रमुख तर संजय भोकसे यांनी संघ व्यवस्थापकाची भूमिका पार पाडली.

डॉ. पंजाबराव देशमुख विधि महाविद्यालयातर्फे हर्षवर्धन रोटे, प्रफुल्ल घवळे,प्रा. राजेश पाटील, प्रा.चैतन्य घुगे,प्रा.नंदकिशोर रामटेके,प्रा.संदीप वानखडे,विजय देशमुख, प्रवीण मिसाळ, प्रवीण गावंडे,रणजित देशमुख,संगीत इंगळे,नरेंद्र जवंजाळ,रवींद्र गावंडे हे खेळाडू सहभागी झाले होते. प्रा.उदय ठाकरे यांनी निवड समिती प्रमुख म्हणून तर प्रा.संजय भोगे यांनी मुख्य व्यवस्थापक म्हणून भूमिका पार पाडली. पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी संस्थेच्या आजीवन सभासदांसह श्री शिवाजी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top