शैक्षणिक जाळ्यातून लाडक्या पाल्यांना वाचवा

अमरावतीत पहिल्यांदाच अभिनव उपक्रम; देशातील यशस्वी तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन

अमरावती/प्रतिनिधी

  देशाच्या भावी पिढीला जीवनाचा योग्य मार्ग दाखविण्यासाठी तसेच त्यांना शैक्षणिक प्रलोभनाच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी अमरावती मध्ये पहिल्यांदाच एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थी व पालकांना देशातील यशस्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असल्याने या कार्यक्रमाची पालकांना विशेष उत्सुकता लागली आहे.
दहावी नंतर विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक प्रलोभन देऊन आकर्षित करण्यात येत आहे.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांना देखील आर्थिक फटका बसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त झाले असल्याने पालकांना या धक्क्यातून सावरता यावे म्हणून शैक्षणिक मार्गदर्शन या उपक्रमाचे आयोजन अमरावतीत करण्यात येत आहे. ट्रेंड नव्हे तर आपल्यामधील असलेल्या इंटरेस्टला फॉलो करा हा मोठा उपक्रम हाती घेऊन अमरावतीच्या जागृत पालकांनी विद्यार्थी व सुजाण पालकांसाठी एक मार्गदर्शनाचे सत्र अमरावतीत आयोजित केले आहे.
या कार्यक्रमातून विद्यार्थी व त्यांच्या पालकांना योग्य शैक्षणिक मार्ग मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हा कार्यक्रम पूर्णतः निःशुल्क असल्याने कार्यक्रमाची उत्सुकता पालक व विद्यार्थ्यांमध्ये असून मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने सदर कार्यक्रमाला दोन तास आधीच उपस्थित राहण्याचे आवाहन अयोजकांनी केले आहे. विशेष करून हा कार्यक्रम दहावीनंतरच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी महत्वपूर्ण असल्याने पालकांसोबतच विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पीडिएमसी परिसर मोर्शी रोड अमरावती येथे पार पडणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top