कठीण परिश्रमाला पर्याय नाही-ब्रिगेडियर संदीप देशमुख

रामकृष्ण महाविद्यालय दारापूर येथे व्याख्यान

अमरावती/प्रतिनिधी

श्री दादासाहेब गवई चारिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित रामकृष्ण महाविद्यालय दारापूर येथे दिनांक 9 मार्च 2024 रोजी ब्रिगेडियर संदीप देशमुख यांचे उद्बोधन पर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.भारतीय सैन्य दलात 35 वर्ष सेवा देत कारगिल युद्धामध्ये सहभागी असलेले ब्रिगेडियर संदीप देशमुख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी ब्रिगेडियर संदीप देशमुख यांनी आपल्या व्याख्यानामध्ये विद्यार्थी यांचे मनोबल उंचावत कठीण परिश्रमाला पर्याय नसल्याबाबत सांगितले.आपल्या जीवनामध्ये कौशल्याचे महत्व विशद करीत असताना समकालीन परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपल्या भवितव्याचा विचार करीत असताना सर्व गुण संपन्न व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच संभाषण कौशल्याचे महत्व पटवून देत असताना भाषेवरती प्रभुत्व मिळवून समाजामध्ये वैयक्तिक प्रतिमा आणि बौद्धिक प्रतिभा उंचावण्याचे कार्य करण्याकरिता आपण विद्यार्थ्यांनी अविरत परिश्रम करावे असे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून स्पष्ट केले. जगत असताना मुलींनी मुलांच्या बरोबरीतच समतोल्य अपेक्षा ठेवूनच जगावे व आपले उज्वल भविष्य कुणावर अवलंबून न ठेवता स्वतः आर्थिक साक्षरता मिळवून गाठावी असे मत त्यांनी व्यक्त करीत महिला सशक्तिकरणावर त्यांनी भर दिला. आपल्या व्याख्यानामध्ये त्यांनी देश सेवेसाठी कार्य करत असताना कशाप्रकारे विविध अनुभव वैयक्तिक व्यक्तिमत्व बळकट करण्याकरिता सार्थक ठरले याबाबत माहिती विशद केली व त्याच बरोबर भविष्यामध्ये कोणत्याही अडचणीचा सामना करण्याकरिता प्रत्येकाने सजग रहावे व नवीन कार्याची जोखीम स्वीकारण्याकरिता प्रयत्नशील राहावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष माननीय कीर्तीताई राजेश अर्जुन यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर यशवंत हरणे हे होते कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर शितल तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर अनिल भगत यांनी केले सदर कार्यक्रमाकरिता महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top