‘आयुष्याच्या उंबरठ्यावर’ ही संकल्पना घेवून महिला दिन साजरा

डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात आयोजन

अमरावती/ का.प्र.
‘आयुष्याच्या उंबरठ््यावर’ ही संकल्पना घेवून मनपा लायन्स क्लब व जेसीआय इंद्रपुरीच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला.
महापालिकेचे महिला व बालविकास अधिकारी नरेंद्र वानखडे व प्रकल्प अधिकारी दिगंंबर तायडे यांनी महाविद्यालयात आजकाल घडणा-या लैंगिक शोषण व तरूणींच्या समस्या या विषयावर प्रबोधन आयोजित केले होते. प्रमुख वक्क्तया डॉ. कालिंंदी राणे, प्रमुख अतिथी लायन्सचे झोन चेअर पर्सन अ‍ॅड. प्रशांत देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. कांचनसिंग, डॉ. भावना उताणे, डॉ. स्वाती टोंगले, डॉ. प्रणाली चौधरी, डॉ. रश्मी गोरडे, डॉ. वैशाली शेंडे आदिंंची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयातील विद्याथीर्aनींनी वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांनी हनी ट्रॅप व सायबर व्रकाइम पासून सावध कसे राहावे याबाबत सल्ला दिला. संचालन डॉ. प्राची कडू, अ‍ॅड. सपना विधळे यांनी तर आभार डॉ. राधिका देशमुख यांनी मानले. सदर कार्यकव्रमाला पदाधिका-यांसह विभाग प्रमुख डॉ. रामटेके, डॉ. राजेश पाटील, डॉ. काळे, डॉ. देशपांडे,डॉ. इंगोले, डॉ. घुगे व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्त्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top