महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मोटरसायकल रॅली व सभेच्या अफाट गर्दीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले

नौटंकीबाजांना घरचा रस्ता दाखवा- आ. यशोमती ठाकूर

अमरावती/प्रतिनिधी

अच्छे दिन च्या नादात दहा वर्षात देशातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार,वंचित आणि शोषितांची घोर फसवणूक भाजप सरकारने केली आहे.आज अमरावती जिल्हा राणा दाम्पत्याने दहा वर्षे मागे आणून टाकलाय त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना,बेरोजगारांना आता न्याय देण्यासाठी शेतीमातीशी जुळलेला आपला हक्काचा माणूस महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना निवडून आणण्याचे आवाहन शिवसेनेच्या फायरब्रॅंड नेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी नेहरु मैदान येथील आयोजित सभेत केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार आ.बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या.बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी व घटक पक्षाचे हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच अफाट जनसमुदाय नेहरू मैदानावर उपस्थित झाला होता. यावेळी सभेला काँग्रेसच्या नेत्या आ.यशोमती ठाकूर, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख,माजी मंत्री सुनील देशमुख,काँग्रेसचे प्रवक्ते ऍड. दिलीप एडतकर,आ. धीरज लिंगाडे,माजी महापौर डॉ. मिलिंद चिमोटे,भैय्या पवार, हरिभाऊ मोहोड, प्रवीण मनोहर,किशोर बोरकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, कम्युनिस्ट पार्टचे तुकाराम भस्मे,नितीन कदम,रामेश्वर अभ्यंकर,वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख,अनिस चे ऍड गणेश हलकारे,शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील खराटे,प्रीती बंड, माजी खा.अनंत गुढे,धाने पाटील,नाना नागमोते, महानगर प्रमुख पराग गुडधे, श्याम देशमुख,सुधीर सूर्यवंशी,बाळासाहेब भागवत,महेंद्र दिपटे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत,शहराध्यक्ष प्रा.हेमंत देशमुख,महिला शहर अध्यक्ष वर्षा भटकर, संगीता ठाकरे,विनेश आडतीया,रमेश बंग, गणेश रॉय,आसिफ तवक्कल, मुक्कद्दर खा पठाण, नसीमभाई, प्रा. सुजाता झाडे, कांचनमाला गावंडे, जयश्री वानखडे, संजय वाघ, मनोज भेले, हरिश मोरे, सुधाकरराव भरसाकले, जयंत देशमुख आदी काँग्रेस – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना आ.ऍड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की,नौटंकीबाज लोकांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे. सच्चा आणि प्रामाणिक मातीशी जुळलेला उमेदवार मिळाल्याने अमरावती जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह असून हा उत्साह मतदानरुपी आशीर्वादात बदलवून बळवंत वानखडे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी आ. यशोमती ठाकूर यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी मोदी सरकार सह विरोधकांवर तोफ डागतअधिकाराचा दुरुपयोग घेत असल्याचे स्पष्ट केले.ईडी आणि सीबीआय या स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग होत असल्याचा पुनरुचार केला. यावेळी विविध पक्षाच्या वरिष्ठ तसेच स्थानिक नेत्यांनी मनोगत व्यक्त करून विरोधकांना धारेवर धरले.सभेचे संचालन हरिभाऊ मोहोड व प्रवीण मनोहर यांनी केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांचेकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला यावेळी माजी खा. अनंत गुढे, बबलू देशमुख, प्रदीप राऊत नामनिर्देशन सादर करतेवेळी उपस्थित होते. आज सकाळी शहरातील महापुरुषांना अभिवादन करून संपूर्ण शहरातून भव्यदिव्य बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले.बळवंत वानखडे यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅली मुळे अमरावती शहरात उत्साह संचारला होता. सभेला उपस्थित असलेल्या अफाट गर्दीने विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

धनशक्ती विरुद्ध माझी उमेदवारी-बळवंत वानखडे

माझी उमेदवारी ही सर्वसामान्यांची उमेदवारी असून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढत असणार आहे.मला जनतेचा आशीर्वाद हवा आहे,तुमची निवडणूक समजून यावेळी मला मतदानरुपी आशीर्वाद द्या तुमचा स्वाभिमान आणि अभिमान मी संसदेत जागृत ठेवल्याशिवाय राहणार नाही असे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top