डॉ.नितीन धांडे यांची हॅट्रिक

विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा अविरोध निवड

उपाध्यक्षपदी अॅड. उदय देशमुख, कोषाध्यक्षपदी प्रा. (डॉ.) हेमंत देशमुख, सचिवपदी युवराजसिंगचौधरी

अमरावती/प्रतिनिधी

विदर्भातील नामांकित शिक्षण संस्था विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षपदी मा डॉ नितीन धांडे यांची तिसऱ्यांदा अविरोध निवड झाली असुन उपाध्यक्ष पदी मा अॅड. उदय देशमुख, कोषाध्यक्षपदी मा
प्रा. (डॉ.) हेमंतजी देशमुख, सचिवपदी मा श्री. युवराजसिंगजी चौधरी वं कार्यकारी सदस्यपदी मा. नितीनजी हिवसे , डॉ पुनम चौधरी ,मा प्रा विनय गोहाड, मा पंकज देशमुख, मा गजानन काळे यांची अविरोध निवड झाली आहे.

महाराष्टातील प्रतिष्टीत शिक्षण संस्था असुन, यांची स्थापना 1965 साली स्व. राम मेघे यांनी केली होती, 2014 साली सुप्रीम कोर्टातील लढा जिंकून डॉ नितीन धांडे, अध्यक्षपदी विराजमान झाले होते. पुन्हा 2019 त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. आता संपूर्ण महाराष्टाचे लक्ष या निवडणुकीवर लागून होते. डॉ नितीन धांडे वं टीम यांच्या निवडीमुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जातं आहे. या टीम ने शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. गेल्या दशकात संस्थेमध्ये विध्यार्थी केंद्रित योजना राबविण्यात आल्या आहेत, त्यामुळे महाविधलयाचा नामांकन आंतरराष्टीय वं राष्ट्यीय पातळीवर नाव झाले आहे. संस्थेच्या महाविद्यालयात मोठया प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. सर्व महाविद्यालयाtत नॅक मानांकन करण्यासाठी प्रयत्न केला गेला, तसेच महाविद्यालयात संशोधना साठी राष्ट्रीय निधी मिळण्यासाठी मागील दशकात प्रयन्त करण्यात आले. सर्वत्र उत्सहाचे वातावरण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top