वझ्झर धरण पाहून परतणाऱ्या युगुलाला चाकूच्या धाक दाखवून लुटणारे चौघे ताब्यात

१ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त

अचलपूर /प्रतिनिधी –

तालुक्यातील वझ्झर धरण पाहून दुचाकीने गावी परतणाऱ्या युगलाला चाकुच्या धाकावर दोन मोबाईल, रोख रक्कम व दुचाकी हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
परतवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास वइझर धरण ते मोहीफाटा रोडवर मित्र व मैत्रीण दुचाकीने येत असतांना लुटणाऱ्या आरोपींना अवघ्या पाच तासात जेरबंद करण्यात परतवाडा पोलिसांना यश आले.
आदित्य रामराव बर्वे (२३, रा. मेहराबपुरा ता. अचलपुर) हा मैत्रिणीसह वझझर धरण परिसरात फिरायला गेला होता. तेथून परत येत असतांना मोहीफाटा रोडवर दोन दुचाकीवर आलेल्या पाच अज्ञात इसमांनी आदित्यची दुचाकी अडवली. त्याच्या मानेवर चाकू ठेवून त्याचा
मोबाईल, नगदी १६०० रुपये तसेच त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. ते आदित्यची दुचाकी देखील घेऊन निघून गेले. त्याला मारहाणदेखील केली. याप्रकरणी, परतवाडा पोलिसांनी रात्री ११.४३ ला गुन्हा नोंदविला.अटक आरोपींमध्ये सलीम खान ऊर्फ कल्लू साबीर खान, शेख शाहीद ऊर्फ मोटू शेख राजीक, शेख सादिक ऊर्फ चिची शेख सलीम (सर्व रा. परतवाडा) व प्रणय रघुनाथ (रा. सराईपुरा, अचलपूर) यांचा समावेश आहे. आरोपींकडून फिर्यादीची दुचाकी, दोन मोबाईल, नगदी १६०० रुपये व गुन्ह्यात आरोपींनी वापरलेल्या दोन दुचाकी व चाकू असा एकूण १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार..
आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ते गडंकी स्मशानभूमीकडे असल्याची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी गुरुवारी पहाटे सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक केली. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय अधिकारी अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली परतवाड्याचे प्रभारी ठाणेदार प्रदीप शिरसकार, उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, हवालदार सचिन होले, पोहवा, सुधिर राऊत, पोहवा, उमेश सावरकर, नापोकों, मनिष काटोलकर, जितेश बाबील, घनश्याम किरोले यांनी केली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top