भरधाव कारची समोरासमोर धडक

सहा ठार ; तीन गंभीर

अकोला – वाशिम महामार्गावरील घटना

अकोला :- अकोला – वाशिम महामार्गावरील पातूर घाटात दोन कारच्या समोरासमोर धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन चिमुकले असल्याची माहिती समोर आली आहे. सदर अपघातातील मृतकामध्ये अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या पुतण्याचा समावेश आहे. अकोला वाशिम महामार्ग वरील चारपदरी मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली होती. त्यामुळेच हे दोन्ही वाहन एकाच रस्त्यावर समोरासमोर आल्याने भीषण अपघात घडला आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून मृतकांमध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या पुतण्याचा समावेश आहे. मृतकांमध्ये रघुवीर अरुण सरनाईक, अस्मिता अजिंक्य आमले, शिवानी अजिंक्य आमले, सिद्धार्थ यशवंत इंगळे, शंकर ठाकरे, सुमेध इंगळे यांचा समावेश आहे तर या अपघातात तीन लोक गंभीर जखमी झाले आहेत.जखमींमध्ये पियुष देशमुख वय 11 वर्ष, सपना देशमुख वय 41 वर्ष आणि श्रेयस सिद्धार्थ इंगळे वय 3 वर्ष हे गंभीर ते जखमी आहेत. नेमका हा अपघात कशामुळे झाला याचा तपास पातुर पोलीस करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top