शेतकर्‍यांचा पिकविमा प्रश्न पेटला

कृषीकार्यालय भातकुलीवर नितीन कदम यांची शेकडो शेतकर्‍यांसह धडक मोहीम

अमरावती/प्रतिनिधी-स्थानिक बडनेरा ग्रामीण भागातील भातकुली तालुक्यामध्ये शेतकरी वर्गाला विवीध नैसर्गिक – अनैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. विवीध माध्यमातून ते आपल्या निदर्शनास येते.शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसान संदर्भात शासन उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे.पंचनामे झाल्यानंतरही नुकसाभरपाईची रक्कम मिळेल या प्रतीक्षेत शेतकरी असताना दरम्यान शासनाने व पिकविमा कंपन्यांनी नुकताच पीकविमा रक्कम जाहीर केली. यावेळी नुकसाभरपाईची रक्कम ऐकताच शेतकरी अवाक झाले. या अग्रिम रकमेत अमरावती जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर अन्याय झाल्याचे आढळून आले. अमरावती जिल्ह्यासाठी केवळ ८ लक्ष रुपयांची रक्कम जाहीर करण्याचे परिपत्रक जाहीर झाले. प्रत्येकी शेतकर्‍याला मिळणारी रक्कम ही केवळ ७८ रुपये इतकी असुन शेतकरी वर्गात खळबळ उडाली.
संबधीत बाब समाजसेवी नितीन कदम यांच्या निदर्शनास येताच शेकडो शेतकर्‍यांसमवेत तालुका कृषी कार्यालयावर धडक मोहीम राबवत सर्वांचे लक्ष वेधले. शेतकर्‍यासोबत कश्या प्रकारे अन्यायकारक भूमिका शासन घेत आहे ? याबद्दल जाब विचारत पिकविमा रक्कम वाढवून देण्याचे निवेदन नितीन कदम यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
शासनाने मंजूर केलेल्या १७०० कोटी रुपयांचा अग्रिम पिकविमा हा जाहीर केला. त्या पिकविमा रकमेमध्ये अमरावती जिल्हाच्या नावे फक्त ८ लक्ष रुपये देण्यात आली. त्या ८ लक्ष रकमेमध्ये शेतकर्‍यांची संख्या १०२६५ एवढी असून असुन म्हणजे प्रत्येकी ७८ रुपये येत आहे. सदर पिकविम्याची रक्कम अमरावती जिल्ह्याकरिता जाहीर करत शासनाने स्थानिक शेतकर्‍यांची चेष्टा केल्याचे आरोप यावेळी शेतकर्‍यांनी केले. यामध्ये सुधारणा करून शासनाचे आश्वासन केलेली २५ ज्ञ् रक्कम ही शेतकर्‍यांना देण्यात यावी त्याचप्रमाणे पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांना सदर योजनेचा लाभ मिळावा यासंदर्भातील निवेदन नितीन कदम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकर्‍यांसह देण्यात आले.
यावेळी स्वप्निल मालधुरे, आकाश पाटील,अभिषेक सवाई, सागर पंचबुद्धे, विनोद पतलीया, प्रफुल्ल महल्ले, दिनू ठाकरे, सोपान भटकर, आकाश बांबर, सागर बारब्दे, मोहन भातकुलकर, परेश मोहोळ, आनंद मोहोड, सचीन देशमुख, राहुल वानखडे, बाबूराव वानखडे, धीरज देशमुख, जयंत पवार, गजानन लेंडे, शंकर बरडे, बंशिभाऊ लाठी, गजानन सवाई, किशोर सरोदे, अर्पण भजभुजे, आकाश मानकर, गोपाल रौराडे, संदीप कोलटेके, भोजराज कोलटेके, प्रदीप मोहोड, गोलू वाघ, श्रीकांत सवाई, संजय सवाई, अशोक झाडे, भुवन दहिकर, सूरज पवार, आनंद ठाकरे व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top