अचलपुर तालुक्यात अवकाळी पावसाची रात्रीपासूनच हजेरी

कपाशी, तुर पिकाला फटका

अचलपूर (प्रतिनिधी ):- रात्रभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने परतवाडा – अचलपूर जुळ्या शहरासह संपूर्ण तालुक्यात रात्रभरापासून हजेरी लावली आहे . यामुळे शेतशिवारात उभे असलेले कपाशी, तूर पिकासह अचलपुर बाजार समितीत विक्री साठी आणलेला शेतमाल काही प्रमाणात अचानक आलेल्या पावसाने भिजला .
अचलपुर – परतवाडा जुळ्या शहरासह तालुक्यात मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली . अचानक आलेल्या पावसाने बाजार समितीत विक्री साठी आणलेला सोयाबीन, मक्का काही प्रमाणात भिजला गेला तसेच शेत शिवारात असलेल्या कपाशी ,तूर पिकाचे या अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे . तसेच कार्तिक पौर्णिमे निमीत्य शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी भागवत कथा तसेच काकड आरतीची समापन होते अचानक आलेल्या या पावसाने आयोजकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top