अचलपूर तालुक्यात शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसायाकडे कल

शासन स्तरावरून जनजागृती व सकारात्मक बदल होण्याची गरज

अचलपूर (प्रतिनिधी)- अचलपूर तालुका नव्हे तर अमरावती जिल्हयात निसर्गाचा लहरीपणा मुळे प्रामुख्याने शेतकऱ्यांचा मुख्य आर्थिक स्रोत असलेले विविध पिकाचे मोठ्या प्रमाणात होत आहे नुकसान . मागील काही वर्षात झपाट्याने बदल झाल्याने घटते उत्पादन, मजुरांची कमतरता, वाढती मजुरी यामुळे शेतकऱ्याना विविध पिकाचे उत्पादन घेत असताना आर्थिक संकटाला सामोरे जाऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर खालावत चालल्याचे चित्र आहे . त्यामुळे शेतकऱ्यांची नवीन पिढी शेतीकडे पाठ फिरवीत ती विकण्याकडे त्यांचा अधिक कल दिसून येत आहे. या मुळे हे थांबवीण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी शेतीला जोड असलेल्या पूरक व्यवसायांना अधिक बळ देण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
पूरक व्यवसायामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा वाटतो तो दुग्ध व्यवसाय.
अचलपूर तालुक्याचाच विचार करायचा झाला तर अनेक शेतकरी आजही शेती बरोबरच परंपरागत दुग्ध व्यवसाय करीत आहेत. पहाटे उठून दूध काढायचे आणि मोटार सायकलला किटल्या अडकवून घरोघरी दूध जाऊन टाकायचे हाच नित्याचाच दिनक्रम आजही कायम आहे .मात्र अचलपूर – परतवाडा जुळ्या शहरासह अमरावती , बडनेरा शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी असताना दुध उत्पादकांना याचा विविध कारणामुळे लाभ घेता येत नसल्याचे सुद्धा चित्र आहे .एकीकडे या भागात तालुक्यातील सर्व दूध संकलित होउन येथे विक्री झाल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होऊ शकणार आहे .दुग्धजन्य पदार्थ बनविण्यावर भर देण्याची मोठी आवश्यकता आहे . दही ,ताक ,लोणी, मावा, श्रीखंड या पदार्थांना कायमच मागणी असते त्यामुळे दुधावर प्रक्रिया करून हे पदार्थ बनविल्यास अधिक फायदा होणार यात शंका नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top