श्र्वासाच्या शेवटपर्यंत राष्ट्रवादी पक्षाला जिवंत ठेवणारा कार्यकर्ता म्हणजे स्व.विजय काळे – आ. बच्चू कडू

अचलपूर (प्रतिनिधी)-शांत , संयमी, निष्ठावान व राजकारणात मजबूत व्यक्तिमत्व म्हणून स्व.विजय काळे यांनी श्वासाच्या शेवटपर्यंत जिल्हा व तालुका स्तरावर राष्ट्रवादी पक्षाला जिवंत ठेवण्यात कार्यकर्ता म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे मत आज अमरावती जिल्हा परिषद माजी कृषी सभापती व सहकार नेते स्व. विजय अजाबराव काळे यांच्या स्मरणार्थ अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील सभागृहात आयोजित श्रद्धांजली चा शोकसभेमध्ये केले.यावेळी स्व.विजय काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सभागृहात आयोजित रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी मध्ये नागरिकाची उपस्थितीती होती .यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री व अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चुभाऊ कडू , अभिजित ढेपे, सुनील वऱ्हाडे,अमरावती माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर,अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले, बल्लूभाऊ जवंजाळ,बंडू वासनकर, डॉ.अजय कडू , सतीश कुमार व्यास ,कैलास आवारे, सल्लू भाई ,बंडू घोम , अमोल चीमोटे आदी विविध पक्षातील नेते मंडळी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज स्व.विजय काळे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थितीत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्व.विजय काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली हार अर्पण करण्यात आले .आणि स्व.विजय काळे यांनी सामाजिक व राजकारणात खडतर प्रवास , कार्यकर्त्याची फळी,राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून विविध आठवणींना या सर्व बाबीवर मान्यवरांनी श्रध्दांजलीनिमित्त उजाळा दिला . सहकार नेते स्व.विजय काळे यांचे २ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास दिर्घ आजाराने निधन झाले. स्वातंत्र्य सैनिक स्व. अजाबराव काळे या शैक्षणीक संस्थेचे संस्थापक, माजी जि.प.कृषी सभापती, अचलपूर बाजार समितीचे माजी संचालक अशा विविध पदावर कार्य करणारे विजय काळे युवा अवस्थेपासुनच राष्ट्रवादी नेते शरद पवार यांचे समर्थक जिल्हयात ओळखल्या जायचे. तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्हयात तगडा जनसंपर्काच्या माध्यमातुन अनेक कार्यकर्ते निर्माण करणारे व्यक्तीमत्व असल्याचे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले .यावेळी सुनील खानझोडे,मनिष शिंगणे ,पोपट घोडेराव,अजय उभाड,गजानन बिजागरे,गजानन भोरे ,दीपक भोरे ,भावेश अग्रवाल ,मंगेश हुड,तोषल चित्रकार, सुनील जवंजाळ,गिरीश भोयर ,अमोल गोहाड,कुणाल ढेपे आदी विविध क्षेत्रातील नेते , कार्यकर्ते,पदाधिकारी व गणमान्य प्रामुख्याने उपस्थितीत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top