महाशिवरात्रीच्या दिवशी गांधी आश्रम मध्ये ‘अग्नी तांडव’

सिलेंडर चा स्फोट होऊन तीन घरे जळून खाक

महाशिवरात्रीच्या दिवशी जेथे अमरावती शहरात प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहात महाशिवरात्री मनविल्या जात होती त्याच ठिकाणी रात्री आठच्या सुमारास प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर अंतर्गत येणाऱ्या गांधी आश्रम येथे असणाऱ्या वस्तीमध्ये असलेल्या एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने तब्बल तीन घरांना आग लागून तीनही घरे जळून खाक झाली.या आगीच्या घटनेमध्ये तीनही घरातील लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
प्राप्त माहितीनुसार,प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर अंतर्गत येणाऱ्या गांधी आश्रम या वस्तीतील रोशनी सागर चांदेकर यांच्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोट मुळे आजूबाजूला असलेल्या तीन घराला आग लागून रोशनी सागर चांदेकर,मिराबाई नागोराव देहाडे व मनोरमा रामकृष्ण फुले या तीन गरीब लोकांच्या कुटुंबाचे घर जळून खाक झाले.आगीच्या घटनेत तीनही घरातील वस्तूंचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.त्यामध्ये घरातील संपूर्ण खाण्यापिण्याच्या वस्तू,धान्य,राहण्याच्या वस्तू,झोपण्याचे वस्त्र कपडे व कागदपत्रांसह सर्वच सामान जळून खाक झाले. मात्र या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून तिन्ही परिवारातील सगळेच व्यक्ती वाचले आहेत.मात्र या आगीच्या घटनेमुळे तीनही परिवार बेघर झाले असून ते आता रस्त्यावर आले आहेत तर तीनही परिवाराने शासनाकडून मदतीची आस धरली असून आता स्थानिक प्रशासन त्यांना कशी मदत करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आगीच्या घटनेची माहिती पोलिसांना व अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाने संपूर्ण आग विझवून घरातील सदस्यांना बाहेर काढले.अग्निशामक दलाच्या तत्परतीमुळे घरातील कुठल्याच व्यक्तीला इजा झाली नाही.दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच शहरातील अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांना वैयक्तिक मदत करणार असल्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top