स्वच्छ सर्वेक्षण ताेंडावर; शहरात माेक्याच्या जागी कचऱ्याचे ढीग

वर्धा / रवींद्र लाखे – स्वच्छ सर्वेक्षणाच्या तोंडावर शहराच्या माेक्याच्या मध्यवर्ती भागात कचऱ्याचे ढिग साचलेले पाहायला मिळत आहे. भररस्त्यावर पडलेला कचरा, त्याला गुरांनी पाडल्याचे चित्र पाहिल्यानंतर नगरपालिका स्पर्धेत कितपत टिकेल, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
दिवाळीच्या सणात शहरातील कचरा उचलणारी यंत्रणा कोलमडली. आजकाल अनेक चौकात कचऱ्याचे ढीग साचले आहेत.सणासुदीच्या दिवसात नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. काही प्रमुख चौकांच्या काठावर कचरा टाकण्यासाठी अघोषित पॉइंट तयार करण्यात आले आहेत. इच्छाशक्तीच्या अभावामुळे प्रश्न सुटत नाही. लोक मोठ्या प्रमाणात कचरा फेकत आहेत.

शहरातील धंतोली चौकात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. तसेच न्यू इंग्लिश शाळेचे परिसर, आर्वी स्टँड चौक, इतवारा चौक परिसर, नेताजी चौक परिसर, टिळक मार्केट. निर्मल बेकरी रोड पत्रावळी चौक पोलीस स्टेशन परिसर आदी ठिकाणी अघोषित कचरा टाकण्याचे ठिकाण आहेत. अनेकदा तक्रार करूनही नगरपालिका प्रशासन लक्ष देत नाही. या कारणास्तव समस्या गंभीर आहे.

प्रमुख चौकांवर टाकला जाणारा कचरा नगरपालिका प्रशासनाने नियमितपणे उचलणे गरजेचे आहे. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील धंतोली चौक, आर्वी स्टँड चौक, न्यू इंग्लिश रोड व इतर चौकात कचऱ्याचे ढीग साचले होते.

चौकाचौकात कचऱ्याचे ढीग

नगरपालीका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील कचरा उचलण्याचे प्रयत्न होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. शहरातील विविध चौकात कचऱ्याचे डंपर बनवण्यात आले आहे. शहरातील धंतोली चौकात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. तसेच न्यू इंग्लिश स्कूल परिसर, आर्वी स्टँड चौक, इतवारा चौक परिसर, नेताजी चौक परिसर, टिळक मार्केट निर्मल बेकरी रोड. पोलिस स्टेशन जवळ. पत्रावळी चौक.आदी ठिकाणी अघोषित कचरा टाकण्याचे डंपिंग बनविण्यात आले आहेत. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे यांनी केली आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top