जिल्ह्यातील दवाखान्यांमधील जलप्रदूषण अधिनियम 1994 नुसार योग्य प्रक्रियेची तपासणी करा

एड.संतोष कोल्हे यांची महाराष्ट्र प्रा.प्रदुषण नियंत्रण मंडळा कडे मागणी


दर्यापुर- संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये शेकडो हॉस्पिटल नर्सिंग होम ट्रामा सेंटर दवाखाने अस्तित्वात असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचे ऑपरेशन डिलिव्हरी सिझेरियन केल्या जातात पैकी काही मोठमोठे हॉस्पिटल मधील जैविक कचरा तसेच मलमूत्र रक्त घातक कचरा धोक्याची रसायने ही रोगराई च्या जीवजंतू सह त्यावर उपलब्ध कायदेच्या तरतुदीनुसार प्रक्रिया करून त्याचे विल्हेवाट न लावता प्रत्यक्षरीत्या सार्वजनिक ठिकाणी फेकल्या जाते व दवाखान्याचे सर्व जंतुसह सांडपाणी सार्वजनिक नाल्या मधे सोडण्याचे ही वस्तुस्थिती आहे अशाप्रकारे दवाखान्यामधिल सर्व वैद्यकीय कचरा व घातक इतर कचरा हा सार्वजनिक ड्रेनेज मध्ये सोडल्याने त्यापासून रोगराई पासून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याचे दाट शक्यता नाकारता येत नाही तसेच अनेक रुग्णालयामध्ये सर्व घातक कचरा हा प्रत्यक्षरीचा उघड्यावर फेकला जात असून काही दवाखान्यांच्या आजूबाजूने विशेष तालुक्याचे ठिकाण चे शहरातील दवाखान्याच्या संदर्भात सार्वजनिक नाल्यांची सुद्धा व्यवस्था नसून तेथील मोठ्या दवाखाने आतील सर्व घाण पाणी रोगांचे ऑपरेशन बाळांतपण सिजर यांच्या रक्तासह बाहेर उघड्यावर सोडले जात असून त्याचे सांडपाणी वाहून जाण्याची सोय नसल्याने जागेवरच मुरत असून आजूबाजूच्या नागरिकांच्या असलेल्या बोअरच्या पाण्यात मिसळून त्या मुळे जनतेला आरोग्य विषयक प्रचंड धोका निर्माण झाला आहे. करीत याबाबत प्रदुषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दवाखान्यावर तपासणी करुन कार्यवाही करावी अशी मागणी विभागीय अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कार्यालय अमरावती यांच्या कडे नागरिक हक्क संरक्षण समिती चे अध्यक्ष एड संतोष कोल्हे यांनी केली,ह्या वेळी समिती चे पदाधिकारी शरद रोहणकर व नागेश रायबोले उपस्थित होते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top