विदर्भस्तरीय शिवदौड मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे आयोजन

अमरावती – शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने आयोजित विदर्भस्तरीय मॅरेथॉन शिवदौड स्पर्धेत आज सुमारे दीड हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. अमरावतीसह नागपूर, अकोला, भंडारा, यवतमाळ आदी विदर्भातील विविध जिल्ह्यातील महिला व पुरुष स्पर्धकांनी या स्पर्धेतील पारितोषिके पटकावली.अवघा साडेतीन वर्षाचा श्रीअंश फाटे,७६ वर्षाचे आनंद पुंडलिकराव हिवराळे आणि विशेष स्पर्धेत सहभागी झालेले दिव्यांग स्पर्धक व आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत भारताचे नाव उंचावणारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तुषार शेळके या शिवदौडचे आकर्षण ठरले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. माजी मंत्री आमदार श्रीमती यशोमती ठाकूर, आमदार सौ.सुलभाताई खोडके, माजी महापौर विलास इंगोले, श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रा.सुभाष बनसोड, स्वीकृत सदस्य नरेशचंद्र पाटील, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.रवींद्र कडू, डॉ.प्रवीण रघुवंशी, भैय्यासाहेब मेटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रम साळी, सहाय्यक महसूल आयुक्त वैशाली पाथरे, विद्यापीठ शिक्षकेतर महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, प्राचार्य दिलीप हांडे,प्रोव्हेन ई.पी.सी.या सोलर कंपनीचे प्रतिनिधी जयसिंगराव देशमुख, माजी प्राचार्य डॉ.रमेश अंधारे शुभारंभ व पारितोषिक वितरण समारंभाला प्रामुख्याने उपस्थित होते.
शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शिवाजी नगर येथील पूर्णाकृती पुतळ्यापासून महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मशाल प्रज्वलित करून आणली व आंतरराष्ट्रीय खेळाडू तुषार शेळके यांनी ती पाहुण्यांच्या स्वाधीन केल्यावर त्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. आयोजन समितीचे प्रमुख व महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे यांनी स्वागतपर तर संयोजक डॉ.सुभाष गावंडे यांनी प्रास्ताविक केले.डॉ.किशोर साबळे, डॉ.उमेश कडू, डॉ.अर्चना बोबडे, डॉ.सुजाता सबाने, डॉ.नितीन चांगोले, डॉ.कुमार बोबडे, डॉ.जी.जी.भारती, डॉ.मनोज जगताप, डॉ.ज्ञानेश्वर नामुर्ते, डॉ.कुलदीप मोहाडीकर, डॉ.संगीता भुयार, अमरावती जिल्हा अॅथलेटिक्स असोशिएशनचे सचिव प्रा.डॉ.अतुल पाटील, प्राचार्य डॉ.अंजली ठाकरे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. शुभारंभ कार्यक्रम व पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे संचालन डॉ.राजेश मिरगे व डॉ.मनोज जोशी यांनी केले.

सर्व महिला व पुरुषांसाठी एकंदर आठ गटात झालेल्या या स्पर्धेला श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथून १० डिसेंबरला सकाळी ६.३० वाजता सुरुवात झाली.१० किलोमीटर पुरुष गटात राजन यादव,नागपूर यांनी प्रथम तर प्रशिक थेटे,अमरावती यांनी द्वितीय तर रीतेक पंचबुद्धेभंडारा यांनी तिसरा क्रमांक पटकावला.अजित भेंडे नागपूर, सुमी फुसाटे वर्धा, संजय पटेल अमरावती यांनी अनुक्रमे चवथे,पाचवे व सहावे स्थान पटकावले.५ किलोमीटर महिला गटात सलोनी लव्हाळे यांनी प्रथम तर अंजली मडावी, भारती बोरकर, वैष्णवी मेमंकर, अनिता परतेकी, प्रीती कापसे यांनी अनुक्रमे दुसरे,तिसरे,चवथे,पाचवे व सहावे स्थान पटकावले.१९ वर्षाखालील ५ किलोमीटर मुलांच्या गटात प्रतिक डांगे, भावेश खंडार, अवेश चव्हाण, प्रणय माहुले, योगेश पदुले, समित टोंग यांनी अनुक्रमे प्रथम ते सहावे स्थान पटकावले, ५ किलोमीटर १९ वर्षाखालील मुलींच्या गटात चैताली बोरेकर, आश्लेषा झोलेकर, राधा नागतोडे, मानसी काथोटे, जनव्ही रोझोडे, हिमांशी बावणे यांनी अनुक्रमे प्रथम ते सहावे स्थान मिळविले.
१४ वर्षाखालील मुलांच्या गटात इशांत नंदनवार, ओम वाडेकर, कपिल आहाटकर, कार्तिक राठोड, सम्यक जरडे, सार्थक कोडपे यांनी अनुक्रमे प्रथम ते सहावे स्थान पटकावले, ४५ वर्षावरील ५ किलोमीटरच्या पुरुष गटात प्रमोद उरकुडे, घनश्याम मदनगीरवार, सुभाष निर्मल्र, शिवाजी गायकवाड, नागोराव भोयर, अशोक सोनोने यांनी अनुक्रमे प्रथम ते सहावे स्थान मिळविले.४५ वर्षावरील ३ किलोमीटर महिला गटात शारदा नागोराव भोयर, कविता राजवाडे, अर्चना मांगे, शिल्पा भारदे, जयश्री वानखडे, सोनाली तायडे यांनी अनुक्रमे प्रथम ते सहावे स्थान पटकावले.१४ वर्षाखालील ३ किलोमीटर मुलींच्या गटात कु.हिमांशी, श्रावणी खोब्रागडे, यशस्वी राठोड, मानवा पाबळे, अस्मिता सोनोने,ऐश्वर्या परसखेरडे यांनी अनुक्रमे प्रथम ते सहावा क्रमांक पटकावला. प्रत्येक गटात सहा याप्रमाणे एकूण दीड लक्ष रुपयांची एकूण ४८ बक्षिसे विजेत्यांना देण्यात आली. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना टी शर्ट, प्रमाणपत्र व मेडल्स देण्यात आले. प्रोव्हन ई.पी.सी.या सोलर कंपनी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघ व शासकीय कंत्राटदार वृषभ देशमुख यांनी ही स्पर्धा प्रायोजित केली.या स्पर्धेसाठी पुरस्कार देणाऱ्या दानदात्यांचा यावेळी पाहुण्यांच्या हस्थे सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top