वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळच करा – आ.संजय केळकर

शासन सकारात्मक असल्याची कामगार मंत्र्यांची माहीती

वर्धा वृत्तसेवा:- राज्यातील सुमारे अडीच लाखाच्या घरात असणार्‍या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राज्य सरकारने स्वतंत्र कल्याणकारी मंडळच करावे अशी ठोस मागणी भाजपचे ठाण्याचे आमदार, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार संजय केळकर यांनी विधानसभेत केली. दरम्यान सरकार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करण्यासाठी सकारात्मक असुन लवकरच त्याबाबत मार्ग काढू असे आश्‍वाासन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केळकर यांना भेटीदरम्यान दिले.
याबाबत बोलताना आ. केळकर म्हणाले, लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्‍या वृत्तपत्रांमध्ये वृत्तपत्र विक्रेता हा महत्वाचा घटक आहे. वारा-पाऊस-थंडी, कोरोना, महापुर अशा कोणत्याही संकटाची तमा बाळगता जगाच्या कानाकोपर्‍यातील बातम्या वृत्तपत्रांच्या माध्यमातुन वाचकांपर्यंत पोचहवण्याचे काम करत आहे. मात्र हा घटक अनेक दिवसांपासुन मुलभूत गरजांपासुन दुर आहे. वेळी-अवेळीचे काम, विश्रांतीचा अभाव, पुरेशा उत्पन्नाचा अभाव यामुळे आयुष्य खडतरीचे असते. त्यातच उतारवयात काम थांबले की जगण्याचेही अवघड होते. अशा संकटावर मात करत वृत्तपत्र विक्रेत्यांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळाची मागणी करत आहेत. त्यांचा हाच प्रश्‍न मी अनेक दिवसांपासुन हातात घेतला आहे, त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे.
विधानसभेत आ. केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचा हा प्रश्‍न मांडताना म्हंटले, सरकारने सर्वच अंसघटीत कामगारांसाठी एकच असंघटीत कामगार मंडळ करून त्यामध्ये छोटीछोटी 39 आभासी मंडळे केली आहेत. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. यामध्येच वृत्तपत्र विक्रेत्यांचा सहभाग केला आहे मात्र राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची एकुण संख्या मोठी आहे अडीच लाखांहुन अधिक आहे. भाजपच्या 2014 ते 2019 च्या सरकारच्या काळात वृत्तपत्र विक्रेता कल्ताणकारी मंडळावर कामही झाले.
कल्याणकारी मंडळासाठी अभ्यासमितीही नेमण्यात आली. त्याचा अहवालही शासनास प्राप्त झाला आहे. त्यामध्येही विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाचा उल्लेख आहे. शासनाने इतरही काही स्वतंत्र मंडळे केली आहेत त्याप्रमाणे या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे, त्यासाठी लागणारा निधीचे मार्गही श्री केळकरर यांनी स्पष्ट केले. हे मंडळ झाले तर खर्‍या अर्थाने वृत्तपत्र विक्रेत्यांना, त्यांच्या कुटुंबासाठी योजना राबवता येतील त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे अशी मागणी आ. केळकर यांनी केली.
शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ व्हावे यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातुन गेली अनेक वर्षे लढा देत आहोत. आमदार संजय केळकर हे सतत त्यासाठी आम्हाला बळ देत आहेत. विधानसभा तसेच इतर वेळीही मंत्रालय पातळीवर सतत पाठपुरावा करत आहेत. शासनाने या मागणीची दखल घेऊन तात्काळ वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटनकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार केंद्रीय समिती सदस्य दत्तात्रय घाडगे, संजय पावसे, गोपाळ चौधरी, सल्लागार शिवगोंड खोत यांच्यासह नरेश शेवडे, गजानन मसने,सतीश सहारे,अजय डोंगरे,सतीश ठाकरे,मोहन मसने, सुधीर मुंजेवार,यशवंत ठाकरे,दिनेश राऊत, हर्श्वर्धन नाखले ‍यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top