नागपुरातील बाजारगाव सोलर कंपनीत स्पोट

स्फोटात 15 ते 16 जणांचा मृत्यू – अनेक कामगार जखमी

नागपूर वृत्तसेवा : नागपूर अमरावती महामार्गावरील बाजारगाव शिवारातील रविवारी सकाळी 9 च्या सुमारास सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत मोठा स्फोट झाला. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तर अनेक कामगार स्पोटात जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृताची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून सांगितले जात आहे. सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंग दरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.दुसरीकडे अपघातानंतर स्थानिक लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बाजारगाव परिसरातील ‘सोलर इंडस्ट्रीज’च्या ‘कास्ट बूस्टर’ युनिटमध्ये सकाळी 9 वाजता स्फोट झाला. ते म्हणाले की किमान 9 लोकांचा मृत्यू झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top