वर्ध्यात भावी आमदारांची वाढदिवसानिमित्त पोस्टरबाजी!

अनेकांना लागले आमदाराचे वेध

वर्धा रवींद्र लाखे : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होतील असे गृहीत धरून वर्ध्यातील अनेक इच्छुकांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. वर्ध्यातील जवळपास सर्वच मतदारसंघातील सर्वपक्षीय तरूण. डॉक्टर. गुरुजींचा. यात समावेश आहे. मात्र यातील काहीजण अगदी आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत.

स्वतःच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून मतदारसंघात पोस्टबाजी सुरू केली आहे.
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका केव्हा जाहीर होतील, हे सांगणे अवघड असले, तरी त्याचे पडघम राजकारण्यांमध्ये आतापासूनच वाजायला लागले आहेत. आगामी निवडणुकीत इच्छुक असणार्‍यांकडून वाढदिवसांचे औचित्य साधत शहरातील विविध भागांतलावलेल्या पोस्टर्सवर स्वत:च्या नावापुढे ‘भावी आमदार’ असे लावले नसले तरीही पोस्टर्सची ही शक्कल पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रभावी वाटत असली, तरी मतदारांवर कितपत प्रभावी ठरेल हे प्रत्यक्ष मतदानामधूनच दिसून येईल.
सध्या शहरातील बहुतांश भागांत भावी आमदारांचे पोस्टर्स झळकत आहेत. राजकीय वर्तुळात हे पोस्टर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

निवडणुका केव्हा होतील, हा जरी प्रश्न असला, तरी नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून ‘भावी आमदार’ असा उल्लेख केला जात असल्याने सध्या शहरात ‘पोस्टर्स वॉर’ सुरू आहे की काय? अशी चर्चा यानिमित्त रंगत आहे.
यावेळी अनेकांचे नावे चर्चेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता महाविकास आघाडीत वर्धेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा केला जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
या भावी आमदारांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे फोटो फ्लेक्सवर झळकविण्याचे काम या इच्छुकांनी साधले आहे. पण
हे भावी आमदार कोणत्या पक्षातून लढणार हे अध्यापही कार्यकर्त्यांना कळले नाही.यामुळे अनेकांचे फोटो फ्लेक्सवर झळकले नाही.

या इच्छुकांमध्ये सर्वाधिक संख्या भारतीय जनता पार्टी व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेचा क्रमांक लागतो. विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षात प्रवेश करण्यास काहीजण इच्छुक आहेत, असे भाजपातील सूत्रांनी सांगितले. इच्छुक असलेले हे भावी आमदार सद्यस्थितीत पक्षात यायला तयार नाही. निवडणुकीला अद्याप वेळ आहे. तोपर्यंत भाजपासाठी परिस्थिती किती अनुकूल राहील यावर इच्छुकांची मोर्चेबांधणी ठरणार आहे. मात्र त्यांची चाचपणी आतापासून सुरू असल्याचे भाजपातील सूत्रांनी सांगितले. ही सारी राजकीय तयारी होईपर्यंत या भावी आमदारांनी विधानभवनाच्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा फोटो झळकविण्याची संधी साधून घेतली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top